सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची योजना आहे तरी सर्व शेतकरी लोकं पर्यंत ही माहिती पोचवावी
💳💳 किसान क्रेडिट कार्ड (KCC)...💳💳💳
शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज...
१ लाख ६० हजार
४ टक्के दराने ३ लाख पिककर्ज
कृषी शेतकरी सन्मान योजना
Ministry of Agriculture and Farmers Welfare
किसान सन्मान निधी
(PM-KISAN)
संपूर्ण तालुक्यातील किसान क्रेडिट कार्ड (KCC) चे फॉर्म भरणे चालू आहे.
ज्या शेतकरी बांधवांना
किसान सन्मान निधी (PM -KISAN) अंतर्गत
प्रती महिना 2000 /- मिळत आहेत त्या शेतकर्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी.
शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डवर पीक कर्जा व्यतिरिक्त १ लाख ६० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.
● किसान क्रेडिट कार्डचा फायदा शेतकर्याला कर्जासाठी कोणतेही कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही व बँकेत चकरा मारण्याची गरज नाही.
● महत्वाचे म्हणजे PM KISAN लाभर्थ्यांना क्रेडिट कार्ड दरम्यान १ लाख ६० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज क्रॉप लोन तसेच पशुपालन,कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसायासाठी मिळणार आहे.
या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना ५० आणि ७५ टक्के अनुदानाच्या योजनेसाठी प्राथमिक भागभांडवल किसान क्रेडिट कार्ड द्वारे मिळणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड (KCC) विषयी थोडक्यात माहिती...
(१) आपल्याकडे शेतीसाठी जमीन असल्यास आपण आपली जमीन तारण ठेवून कर्ज घेऊ शकता. त्याची मर्यादा एक लाख रुपये होती. पण आता आरबीआयने हमी नसलेल्या कृषी कर्जाची मर्यादा १.६० लाख रुपये केली आहे.
(२) पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनातील शेतकर्यांना देखील आता केसीसीच्या माध्यमातून दोन लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या मर्यादेपर्यंत ४ टक्के व्याज दराने लाभ मिळणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना सावकारांकडून मुक्ती मिळेल.
(३) सध्या देशात ७,०२,९३,०७५ शेतक्यांकडे केसीसी आहे. केसीसी अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने बँकांच्या मदतीने शेतकऱ्यांचा केसीसी बनविण्याची मोहीम सुरू केली आहे. ज्याअंतर्गत अर्ज सुलभ केला गेला आहे आणि फॉर्म मिळलेल्या दिवसाच्या १४ दिवसांच्या आत केसीसी जारी करण्याच्या आदेशाचा समाविष्ट केला आहे.
(४) शेतकऱ्यांसाठी केवळ ४ टक्के दराने पैसे देण्यासाठी जे किसान कार्ड बनविले जाते, त्याला बनविण्यासाठी लागणारी सर्व प्रोसेसिंग फी, इंस्पेक्शन आणि लेजर फोलियो शुल्क रद्द केले आहे. जर एखादी बँक अद्याप शेतकर्याकडून हा शुल्क वसूल करते तर त्यावर कारवाई केली जाऊ शकते. या कार्डच्या माध्यमातून ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. तसेच पूर्वी १ लाखांचे कर्ज गॅरंटीशिवाय दिले जात होते, जे आता १.६० लाख रुपये केले गेले आहे.
4 टक्के दराने कृषी कर्ज कसे मिळवावे :
दरम्यान, शेतीचे व्याज दर ९ टक्के आहे. पण त्यात सरकार २ टक्के अनुदान देते. अशा प्रकारे ते ७ टक्के करते. पण वेळेवर परत केल्यावर तुम्हाला ३ टक्के अधिक सूट मिळते. अशा प्रकारे त्याचा दर प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी फक्त ४ टक्के आहे. कोणताही सावकार इतक्या स्वस्त दरावर कर्ज देऊ शकत नाही. अश्या परिस्थिती तुम्हाला कर्ज हवे असल्यास बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड बनवून शकता. त्याअंतर्गत तुम्हाला ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
संपर्क :
0 Comments